आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) न्यायाधीशपदी भारताचे दलवीर भंडारी यांची फेरनिवड झाल्याने संयुक्त राष्ट्रसंघात भारताने मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे.न्यायाधीशपदाच्या शर्यतीत भंडारी आणि ब्रिटनचे उमेदवार ग्रीनवुड यांच्यात चुरस होती. मात्र, अखेरच्या क्षणी ग्रीनवुड यांनी माघार घेतल्याने भंडारी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी निवडणूक झाली. त्यात भंडारींना महासभेत 193 पैकी 183 मते मिळाली. सुरक्षा परिषदेतील सर्व 15 सदस्यांचीही मते मिळाली. दलवीर भंडारी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली. 1968 ते 1970 या काळात त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. शिकागो येथे काही काळ वकिलीही केलीआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews