पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर अल्पावधीच व्हायरल होऊ लागला. ही सुंदर तरूणी पंजाब पोलीस दलात कार्यरत असल्याचे सांगून तो फोटो व्हायरल झाला. अर्थात इतक्या सुंदर पोलीस अधिकाऱ्याच्या चर्चेला सुरूवात झाली, लोकांनी तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.पण नंतर मात्र लोकांना आपण केलेली गल्लत लक्षात आली. हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो एका अभिनेत्रीचा आहे हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं. या अभिनेत्रीचं नाव कयामत अरोरा असून ती सध्या एका पंजाबी चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात ती हर्लिन मान नावाच्या महिला पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे कदाचित लोकांचा अधिक गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे. पण काहीही असलं तरी ती सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews