'मोदी सरकारच्या अहंकारामुळं संसदीय लोकशाहीचं नुकसान होत आहे. कुठलंही ठोस कारण नसताना सरकारनं संसदेचं हिवाळी अधिवेशन रखडवून ठेवलं आहे. या सरकारमध्ये आणि पंतप्रधान मोदींमध्ये संसदेला सामोरं जाण्याची हिंमत नाही हेच यातून दिसतं,' अशी टीका सोनिया गांधी यांनी आज केली. सोनियांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सोनियांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची बदनामी होऊ नये म्हणून केंद्र सरकार संसद अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. त्याच अनुषंगानं सोनियांनी सरकारला फटकारलं. 'लोकशाहीच्या मंदिराला टाळं ठोकण्याचा विचार कुणी करत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. घटनात्मक जबाबदारीपासून पळ काढण्याचा हा प्रकार आहे,' असं त्या म्हणाल्या.
नोटाबंदीच्या निर्णयावर सोनियांनी पुन्हा एकदा प्रहार केला. 'नोटाबंदीमुळं कसलाही फायदा झालेला नाही. शेतकरी, छोटे व्यावसायिक, गृहिणी आणि असंघटित कामगारांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम या निर्णयानं केलं आहे. मूठभर श्रीमंतांचं भलं करण्यासाठी गरीब आणि वंचितांचं भविष्य बरबाद केलं जात आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews