म्हणूनच चक्क पोलिसांनी मानले आभार । पहा काय घडला प्रकार | Police Latest News

Lokmat 2021-09-13

Views 1

नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेवरून ट्विटर हे किती प्रभावी माध्यम ठरू शकते, याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला. अमन नावाच्या तरूणाने आपल्या ‘जुगाडू बंदा’ @jugadu_banda या ट्विटर हँडलवरून रविवारी रात्री एक ट्विट केले. यामध्ये त्याने आपल्याला रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका रिक्षेत लहान अर्भक सापडल्याचे म्हटले होते. हे अर्भक साधारण तीन ते पाच दिवसांचे असावे. आता पुढे काय करायचे, हे मला कळेनासे झालेय. कृपया माझी मदत करा, असेही त्याने ट्विटमध्ये लिहले होते. अमनने ट्विटमधील संदेशाबरोबर या अर्भकाचे काही फोटोही ट्विट केले होते. काही वेळातच अमनचे हे ट्विट मुंबई पोलिसांच्या नजरेस पडले. तेव्हा पोलिसांनी लगेचच अमनशी संपर्क साधून या अर्भकाची चौकशी केली. त्यानंतर अमन या अर्भकाला कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर अमनने ट्विट करून हे अर्भक सुखरूप असून मुंबई पोलिसांकडे सुरक्षित असल्याचे सांगितले. काही नागरिकांना देवाने पाठवलेले असते, असे ट्विट करून मुंबई पोलिसांनी अमनचे कौतुक केले. तुमच्यासारखे जागरूक नागरिक मुंबईत आहेत. शहराच्या सुरक्षेत ते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत पोलिसांनी अमनचे आभार मानले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS