राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आपल्या वैयक्तिक आयुष्यातला एक किस्सा उपस्थितांना सांगितला. कचरा केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करेन अशी धमकीवजा सूचना आपल्याला कन्येने दिल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, मी एकदा तिच्यासोबत खेळत होतो. त्यावेळी मी नॅपकीन पेपरचा चेंडू तयार करून तिच्या दिशेने फेकला. यावेळी तिने मला कचरा केला तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्याकडे तक्रार करेन असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी हा किस्सा सांगितल्यावर कार्यक्रमात हशा पिकला. पुण्यात रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालपणी जडणाऱ्या स्थूलपणाविरोधात उपक्रम सुरु करण्यात आला. या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews