नातेवाईकांकडून भेटीच्या स्वरुपात मिळालेली रोख रक्कम करमुक्त करण्यात आली आहे, यामुळे प्राप्तीकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे असे म्हणता येईल. नातेवाईकांकडून मिळालेली रोख रक्कम तुम्ही बँकेत भरायला गेलात तर तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. परंतु हि रक्कम तुम्ही तुमच्या उत्पन्नात समाविष्ट केली तर मात्र त्यावर कर भरावा लागेल.भेटीच्या रकमेची काय मर्यादा आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. प्राप्तीकर विभागाने या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत.डेबिट म्युच्युअल फंडावर मिळणाऱ्या भांडवली लाभावरचा कर हा त्याच्या मुदतीवर अवलंबून असणार आहे. भांडवली लाभाची मुदत जर तीन वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यावर निश्चितपणे कर लागू होईल.तसेच भांडवली लाभाचा कालावधी तीन वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यावर किमान 20 टक्के कर लागू होण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews