कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना मागील अनेक वर्षांपासून देवनार मध्ये दवाखाना उघडून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर ला पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस डॉक्टर ने दिलेल्या इंजेकशन दुष्परिणामामुळे एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे चौकशीत सामोर आले आहे. त्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. देवनार परिसरात राहणाऱ्या प्रदीप आनंद जाधव याची तब्बेत काही दिवसांपासून बिघडली होती, त्यामुळे उपचारासाठी तो देवनार येथील बोगस डॉक्टर शाहबाज आलम मोहम्मद हारून सिद्दिकी उर्फ शेख याच्याकडे गेला. शेख याने त्याला इंजेक्शन दिले. मात्र त्याची प्रदीप ला बाधा झाली. त्याची प्रकृती खालवल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला केइएम रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews