दक्षिण भारतचे सुपरस्टार नागार्जुनच्या हैदराबाद येथील अन्नपूर्णा फिल्म स्टुडिओला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. बंजारा हिल्स परिसरात हा स्टुडिओ असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागार्जुनचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी 6.15 वाजता ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यास अग्निशमन दलाला जवळपास दोन तास लागले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटले जात आहे. विविध रिअॅलिटी शो, मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग या स्टुडिओमध्ये केले जाते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews