गुजरात ची सत्ता राखण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपा ला निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. पप्पू शब्दाचा वापर असलेली भाजपा ची एक व्हिडीओ जाहिरात निवडणूक आयोगाने रोखून धरली. हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीचा उपहास व अपमान करणारा आहे, असं आयोगाने म्हटले आहे. भाजपाच्या गुजरात शाखेने 31 ऑक्टोबर रोजी एक जाहिरात मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवली होती. या जाहिरातीत पप्पू नावाचे पात्र दाखवण्यात आले आहे. काही कामानिमित्त हा पप्पू दुकानात जातो. दुकानात काम करणारा व्यक्ती त्याला पाहून “ सर, पप्पू आला आहे” असं त्याच्या मालकाला सांगतो. हा पप्पू मुका आहे. आणि विकास म्हणजे काय हे त्याला कळत नसल्याचे दाखवण्यात आले आहे. अर्थात पप्पूचा चेहरा जाहिरातीत दाखवण्यात आलेला नाही. अस असलं तरी निवडणूक आयुक्तांनी त्यास आक्षेप घेतला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews