उत्तर काश्मीर च्या कुपवाडा जिल्ह्यात सोमवारी पोलीस ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेत सर्व परिसर पिंजून काढला. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवादी व सुरक्षा दल यांच्यात जोरदार चकमक झाली. सुरक्षा दलाच्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तर एक भारतीय जवान जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. दहशतवादांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ह्या चकमकीनंतर संपूर्ण परिसराला लष्कराने घेरले आहे. आणखी किती दहशतवादी लपून बसले आहेत तो आकडा अजून मिळू शकलेला नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews