काही दिवसांपूर्वी वायरल झालेला व्हिडीओ आपण पाहिला असेलच ज्यात एक महिला आपल्या तान्ह्या बाळाला स्तनपान करीत आहे आणि एक पोलीस कॉन्स्टेबल ती गाडी जप्त करून घेवून जात आहे. आता त्यावर ह्या घटनेची दुसरी बाजू सामोर आली आहे, त्या गाडीत बसलेली महिला ज्योती माळे उर्फ राखी ह्यांनी त्या ट्राफिक कॉन्स्टेबल ला निलंबित करू नये अशी विनंती केली आहे. हा व्हिडीओ ज्योती माळे चे पती जयराज माळे ह्यांनी शूट केला होता, नंतर त्यांनी ती फेसबुकवर अपलोड केला. आणि तो लगेचच सगळीकडे व्हायरल झाला होता. ह्यानंतर ट्राफिक कॉन्स्टेबल राणेला निलंबित करण्यात आले होते. ह्यावर ज्योती ह्यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्या कॉन्स्टेबल ला निलंबित करण्यात आले आहे हे ऐकून मला खूप दुःख झाले आहे. आणि तिने विनंती केली आहे त्या कॉन्स्टेबल चे निलंबन मागे घावे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews