काही दिवसांपूर्वीच एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याने प्रवाश्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा किस्सा ताजा असतांनाच आता पुन्हा अशीच एक बातमी जयपूर विमानतळावरून आली आहे. इंडियन एअर्लाइन्स ची सहाय्यक कंपनी एलायंस एअर चे विमान लखनऊ हून जयपूर ला आले होते, आणि तिथून ते विमान दिल्लीला रवाना होणार होते. हे विमान जयपूर विमानतळावर ८.३० वाजता पोहोचणार होते. परंतु विमान पोहचायला १० वाजले. जेव्हा प्रवासी दिल्ली जाण्यासाठी विमानात चढत होते तेव्हा वैमानिकाने नकार दिला आणि सांगितले कि “ माय टाईम इज ओवर “ म्हणजे माझी ड्युटी आता संपली आहे. हे ऐकताच प्रवासी रागावले. तेव्हा विमानतळ अधीक्षकाने काही लोकांना बस ने दिल्लीला पाठवण्याची व्यवस्था केली आणि काही प्रवाश्यांची हॉटेल मध्ये व्यवस्था केली. आणि ते म्हणाले कि सुरक्षेच्या कारणांमुळे कुठलाही वैमानिक आपल्या ड्युटी चे तास वाढवू शकत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews