अल्पसंख्यांक याचिका अमान्य.
भारतात हिंदू धार्मिक लोक बहुसंखेने आहेत, परंतु देशात ८ असे राज्य आहेत जेथे हिंदूंची संख्या अल्पसंख्यांएवढी आहे. म्हणून ह्या राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून ते म्हणाले कि तुम्ही राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाशी संपर्क साधा. बीजेपी नेता अश्विनी उपाध्याय ने याचिकेत म्हटले आहे कि २०११ च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, मिझोरम आणि पंजाब ह्या ८ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. याचिकाकर्ता अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले कि २३ ऑक्टोबर १९९३ रोजी नोटिफिकेशन काढून मुस्लीम सोबत अन्य धर्मीय समुदायांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्यात आला हे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews