8 नोव्हेंबर 2017 रोजो नोटबंदी ला एक वर्ष पूर्ण झाले याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हाती आलेल्या माहिती नुसार जयपूर येथे राज्य सरकारच्या युवा बोर्ड ने हिंदू अध्यात्मिक आणि सेवा फाऊनडेशन मिळून सवाई माधवसिंग मैदानावर नोटबंदी वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्याक्रर्मात जवळ जवळ 50000 लोकं उपस्थित होते. त्या सगळ्यांनी मिळून वंदे मातरम आणि राष्ट्र गीत गायले. परंतु मुल मुद्दा हा आहे कि ह्यावेळी लोकांच्या हातात जे राष्ट्रीय ध्वज होते त्यात अशोक चक्रच नव्हते. यामुळे विरोधी पक्षाला आयते कोलीतच मिळाले आहे. ह्यावर सचिन पायलट म्हणाले कि बीजेपी जी स्वतःला सगळ्यात राष्ट्रभक्त पार्टी म्हणवते त्यांच्या लोकांमध्येच राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर भावना नाहीये.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews