मुंबईत राहाणारी पूजा बिजार्निया हिने आपल्या वडिलांना जीवदान देण्यासाठी स्वत:च्या यकृताचा एक भाग दिला. लोक मुलींना डोक्यावरील भार समजतात. मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस करतात. यासाठी स्त्रीभूण हत्या करतात, यांच्यासाठीच पूजा बिजार्निया हिच्याविषयी पोस्ट शेअर केल्याचे डॉ. रचित यांनी सांगितले.पूजा बिजार्निया ही मुंबई येथे राहते. ती रिलायन्स जिओमध्ये जॉब करते. तिच्या वडिलांना यकृताचा आजार जडला होता. त्यामुळे त्यांचे यकृत निकामी झाले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यावर डॉक्टरांनी एक उपाय सुचवला. तो म्हणजे घरातील व्यक्तीच्या यकृताचा भाग लावणे. पूजाला दोन बहीणी आहेत. परंतु पूजाने क्षणाचा विलंब न करता साहसी निर्णय घेतला.पूजाने स्वत:चा यकृताचा एक भाग वडिलांना देऊन त्यांना जीवदान दिले.यकृत ट्रान्सप्लंट ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती. पूजाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews