बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला हतबल करणारी मेरी कोम राज्यसभा सदस्य आणि भारतीय बॉक्सिंग संघाचे परीक्षक म्हणून देखील सक्रिय आहे. याशिवाय मेरी कोम तीन मुलांची आई आहे. वयाच्या 35 व्या वर्षी मेरी कोमने आपल्यातील बॉक्सिंगचे कसब दाखवून देत पाचव्यांदा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे पेलणारी मेरी कोम म्हणाली की, राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यापासून नियमित संसदेत जाते. सरकारी परीक्षक असल्याने भारतीय बॉक्सिंग संघाच्या नियमित होणाऱ्या बैठकीलाही उपस्थित रहावे लागते. हे सर्व सांभाळून सराव केला. अनेक भूमिका सांभाळत यश मिळवणे किती कठीण असते, हे लोक समजू शकतील. मी एक आई आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे लागते. अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हवे असणारे बळ माझ्यात नक्की कोठून येत, हे अद्याप समजू शकलेलं नाही, असेही ती म्हणाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews