एका जाहिरातीत म्हंटलं होतं "सेकंड हॅन्ड हुवा तो क्या हुवा हमारे लिये तो फर्स्ट हॅन्ड है "
आपण आजपर्यंत अनेक अलिशान गाड्या पाहिल्या असतील. या गाड्यांच्या किंमती ऐकून अनेकदा अवाक व्हायला होते. मात्र, त्या तुलनेत या गाड्यांची सेकंडहँड मॉडेल्स काहीशी स्वस्त असतात. निदान आजपर्यंत आपला असा समज असेल. मात्र, बुगाटी सिरॉन (Bugatti Chiron) या गाडीची किंमत ऐकल्यानंतर तुमचा हा समज खोटा ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही गाडी सेकंडहँड असून त्याची किंमत गाडीच्या मूळ मॉडेलपेक्षा जास्त आहे. साहजिकच हे कसे शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कंपनीने या मॉडेलच्या फक्त 500 गाड्याच तयार केल्या होत्या. साहजिकच मॉडेल्सची संख्या मर्यादित असल्यामुळे सध्याच्या बाजारपेठेत या गाडीला चांगलाच भाव आला आहे. ही गाडी 261 मैल प्रतीतास इतक्या वेगाने धावते. या गाडीला ग्राहकांच्या सोयीने कस्टमाइज करण्यात येते. या गाडीची मूळ किंमत 30 कोटींहून अधिक आहे. यातून कार दुसऱ्या ग्राहकाला विकणाऱ्याला 8 कोटींहून अधिक नफा होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews