मी जर मंत्रिमंडळात सामील झालो तर शिवसेना बी.जे.पी. ची साथ सोडेल. आणि जर असे झाले तरशिवसेनेचे अर्ध्याहून अधिक नेते बी.जे.पी. त सहभागी होतील असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचेसंथापक श्री नारायण राणे ह्यांनी केले. ते म्हणाले कि शिवसेनेने महाराष्ट्रात बी.जे.पी. सोबत युती केली आहे, परंतु तरीही शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत असते. जे योग्य नाही. नारायण राणे ह्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून स्वतःच्या पक्षाची स्थापना केली होती. राणे म्हणाले कि शिवसेनेला बी.जे.पी सत्तेचा
केंद्रबिंदू झालेला बघवले जाणार नाही म्हणून ते असे खेळ खेळत आहेत. भारतीय जनता पार्टीने तीन वर्षात चांगली कामं करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत आहेत. मला जे मंत्रिपद मिळणार होते ते शिवसेनेच्या आडमुठ्या स्वभावामुळे धूसर झाले आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ते मला निस्रः करणार नाहीत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews