शत्रुघ्न सिंह यांची पार्टी विरोधी नेहमीच अधोरेखित होत आली आहे. त्यांनी आता नेवीन भूमिका घेतली आहे कि भा.ज.पा. हि आता वन मॅन शो आणि दोन सैनिकांची सेना झाली आहे आणि त्यातून लवकरच बाहेर येणे आवश्यक आहे. सिन्हा ह्यांनी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणूकीला मोठे आव्हान म्हटले आहे. शिवाय तरुण असो किंवा शेतकरी वा व्यापारी सुद्धा भगवा पार्टीच्या अनेक निर्णयांमुळे दुःखी आहेत. ते म्हणाले कि सगळ्यांनी एका कुटुंबासारखे राहिले पहिले. वरिष्ठ नेता ज्यांनी पार्टी वाढवण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्ची पडले. आजपर्यंत जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिंह आणि अरुण शौरी ह्यांनी काय गुन्हा केला हेच मला कळले नाही. त्यांना मुद्दाम बाजूला करून पार्टीच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य बनवण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews