Trumpने वाढवल्या भारतीयांच्या अडचणी | International News | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 100

अमेरिकेत काम कारण हे बऱ्याच कामगारांचं स्वप्न आहे. जगातील मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश अमेरिका प्रत्येकाला भुरळ पडतो. पण व्हिसा न देऊन अनेकांना तोंड घशी अमेरिकेने अनेकदा पडलं आहे. अगदी पंतप्रधान मोदींना ही व्हिसा देण्यास नकार देणाऱ्या अमेरिकेने आता नवा डाव मांडला आहे. अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाने तेरा वर्षे जुने धोरण गुंडाळले आहे.बिगर स्थलांतरितांसाठी असलेला "एच-1बी' आणि "एल-1' या व्हिसाला मुदतवाढ देण्याचे नियम अमेरिका सरकारने कडक केले आहेत. या दोन्ही व्हिसांना भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. आता व्हिसाला मुदतवाढ घेताना पुरावा देण्याची जबाबदारी अर्जदाराची असणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS