मुंबईच्या वाहतूक कोंडीवर भारताचा महान क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडूलकर बोलता झाला आहे. मुंबईची वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यात भारताच्या कान्याकोपऱ्यातून रोज शेकडोंनी लोकं येत आहेत. एल्फिन्स्टन रोड वरील चेंगराचेंगरीची घटना ताजीच आहे. म.न.से. ने स्टेशन भोवती अनधिकृतपणे दुकानं थाटनाऱ्यांवर पूर्व सूचना देवून थेट कारवाई सुरू केली आहे. अश्या पार्शभूमीवर सचिनची प्रतिक्रिया खूप बोलकी आणि महत्वाची आहे. त्याने सुचवले कि हॉंगकॉंगसारखी जलवाहतूक सेवा मुंबईतही सुरु करण्यात यावी. व्हिजन 2025 हि प्रकल्प योजना डोळ्यांसमोर ठेवून शहरात नो पार्किंग झोनची संख्या वाढवावी, स्वतंत्र हॉकिंग झोन, पादचारी पूल आणि रेल्वे स्थानकांवरील फलाट रुंद करण्यात यावेत अशा सूचना त्याने मुंबईचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंघ कुशवाह यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews