शाहरुख खान आणि करण जोहर ह्यांच्या गाढ मैत्रीबद्दल सगळ्यांना माहित आहेच. ह्या जोडीने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता शाहरुख खान आणि करण जोहर दहाव्यांदा एकत्र येणार आहेत. दोघांनी मिळून ‘ इत्तेफाक ‘ च्या रिमेकची निर्मिती केली आहे. ह्या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा , सोनाक्षी सिन्हा, आणि अक्षय खन्ना झळकणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ह्या चित्रपटाबाबत लोकांमध्ये चर्चा आहे आणि हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या एका कार्यक्रमानिमित्त शाहरुख खान आणि करण जोहर एकाच मंचावर हजर होते. त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरे खूप रोमांचक होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews