फूल आणि त्याचा सुगंध हे प्रत्येक व्यक्ती ची प्रिय गोष्ट असते..जगातील सर्वात मोठे फूल असो किंवा रंगबिरंगी फूल असो..आता ज्या फुला बद्दल आम्ही सांगणार आहोत ते 3 हजार वर्षात फक्त एकदाच दिसते. या फूलाचे नाव संस्कृत नाव Udumbara आहे. ज्याचा अर्थ होते स्वर्गातील फुल. काही वर्षापासून हे फुल जगभर पाहिल्याचा दावा केला गेला आहे. सर्वात ताजी घटना 2007 मधील आहे, जेव्हा चीनमधील डॉ. डिंगने या फुलाचा शोध लावला होता. त्यांच्या बागे मधे 38 फुलांचा एक गुच्छ पाहायला मिळाला होता..अशी आख्यायिका आहे की, सर्वप्रथम हे फुल पृथ्वीवर गौतम बुद्ध यांच्या जन्माच्या आधी दिसले होते. यानंतर 1997 मध्ये दक्षिण कोरियातील एका मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीवर हे फुल उमललेले होते. बौद्ध ग्रंथांत या फुलाचे विशेष महत्व सांगितले आहे.या फुलाचे वैशिष्ट्ये हे की, हे जेथे फुलते, उमलते तेथे त्याचा सुगंध दरवळतो. मात्र, उघड्या किंवा खुल्या डोळ्यांना मानवाला हे फुल दिसू शकत नाही. हे फुल पाहायला मॅग्निफाईंग लेन्स किंवा मायक्रोस्कोपची गरज पडते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews