सलमान नपुंसक जुबेर खानने घातला वर्मी घाव
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि बिग बॉसमधून बाहेर काढलेल्या जुबेर खान यांच्यातील वाद वाढत चालला आहे. जुबेर खानने सलमान खानच्या वर्मावर बोट ठेवल्याने हा वाद आणखीनच भडकणार असल्याचे दिसत आहे. सलमान खान नपुंसक असल्याने त्याचे लग्न होत नसल्याची बोचरी टीका जुबेर खानने केली आहे. तसेच सलमावर गेल्या १५ वर्षांपासून असलेले सर्व खटले पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात याचिका करणार असल्याचे जुबेर खानने म्हटले आहे.याबाबत बोलताना जुबेरने सांगितले की, सलमानसोबतची वैचारिक लढाई लढण्यासाठी त्याच्यावरील सर्व खटल्यांची माहिती मिळवत आहे. सत्य समोर आणण्यासाठी पुढील काळात तो सलमानच्या विरोधातीत सर्व प्रकरणांवर याचिका दाखल करेल, त्यामुळे सलमानची झोप उडणार आहे. बिग बॉस या कार्यक्रमापेक्षा या दोघानाच्या झडपेचा फायदा यांना सोडून बाकी सगळ्या होत आहे. हा वाद किती विकोपास जातोय हे पाहणे आता चुरशीची ठरणार इतकं मात्र नक्की !