ऐन दिवाळीत बेस्ट आणि एस टी कामगारांचा संप
ऐन दिवाळीत जेव्हा चाकरमाने आपल्या घरी जाण्याकरता एस टी बस कडे धाव घेतात...तेव्हाच महाराष्ट्राची लाईफ लाईन समझली जाणारी एस टी चे कामगार संपावर जाण्याच्या तयारीत आहे..सातवा वेतन आयोगाच्या शिफारीशी लागू व्हाव्यात ह्या साठी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेली चर्च फिस्कटली असून त्यामुळे ऐन दिवाळी मध्ये एस टी कामगार संपावर जाण्याच्या तयारीत आहे..तसेच बेस्ट च्या कर्मचाऱ्यांनी हि संपाचे हत्यार उपसले आहे ..बेस्ट च्या कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर ना झाल्या मुळे ते संपावर जाण्याच्या तयारीत आहेत..बेस्ट कर्मचाऱ्यांनी भाऊबीजेचा दिवस निवडला आहे संपा करता. त्यामुळे भाऊबहिणीच्या ह्या सणाच्या दिवशी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.