टायटल पेक्ष्या मानधन अधिक | जाणून घ्या पद्मावती फिल्म मध्ये कोणाला किती मानधन मिळाले
लार्जर देन लाईफ याचं मूर्तिमंत उदाहरण संजय लीला भन्साळी च्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं.. भन्साळी यांचा बहुचर्चित पद्मावती सिनेमाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.आता या सिनेमातील कलाकारांचे मानधनही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमासाठी प्रत्येक कलाकारांनी तगडे मानधन घेतले आहे. मानधनाबद्दल पद्मावतीच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अभिनेता जिम सरब या सिनेमात खिल्जीचा सर्वात जवळ असणाऱ्या मलिक काफूरची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी जिमने साधारणतः ७० लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.तर दुसरीकडे अदिती राव हैदरी या सिनेमात मेहरुनिशां ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने ८५ लाख रुपये मानधन घेतले.शाहिद कपूर यांनी जवळपास ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.
खिल्जी व्यक्तिरेखेच्या आज प्रत्येकजण प्रेमात आहे. या व्यक्तिरेखेसाठी रणवीरने दिवस- रात्र एक केली.त्याने जवळपास ८ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते या संपूर्ण टीममध्ये सर्वात जास्त रक्कम कोणी घेतली असेल तर ती आहे राणी पद्मावती अर्थात दीपिका पदुकोणने.दीपिकाने जवळपास ११ कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते.