कपिल शर्मा चा ‘फिरंगी’ चित्रपट मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित | मराठी न्यूज चैनल | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

विनोदवीर कपिल शर्मा कधी त्याच्या विनादाकरता तर कधी वादांकरता बातम्यांमध्ये असोच असतो. कपिल शर्माचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’चा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कपिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हा मोशन पोस्टर शेअर केला आहे. हा कपिलचा दुसरा चित्रपट असून, राजीव ढिंगराने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये कपिलसोबत ईशिता दत्ता आणि मोनिका गिल झळकणार आहेत. इतकंच नाही तर नेहमी विनोदाची फटकेबाजी करणारा कपिल या चित्रपटात एक गाणंही गायला आहे.या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला ‘युके’चा झेंडा पाहायला मिळतोय. त्यानंतर पोलिसांच्या गणवेशातील कपिल त्यासमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या पाठीत लाथ मारताना दिसतोय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS