नाशिक - उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ओसंडून वाहणा-या उत्साहामध्ये लोकमतच्यावतीने आयोजित नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककरांसह महाराष्ट्रातील विविध शहरांमधून तसेच गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरुष गटात लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर ज्येष्ठांच्या महिला प्रवर्गात अर्जेंटिनाच्या लिना यांनी द्वितीय क्रमांक राखला.