नाशिक : रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली . चार दिवसानंतर प्राथमिक शाळांची घंटा वाजणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी रविवारच्या सुटीमुळे नागरिक मोठ्या संख्येने आपल्या पाल्यांना घेऊन बाहेर पडले होते . त्यामुळे बाजारात गर्दी झाली होती . दुपारी अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांची पंचाईत केली.