अकोला : शहरातील टिळक मार्गावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यासाठी सुरु असलेल्या खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचा निषेध करण्यासाठी तसेच रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सागर भारुका यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी रविवारी खोदलेल्या रस्त्यात साचलेल्या पाण्यात बसुन अनोखे आंदोलन केले.