नाशिक - लहानपणापासूनच निसर्गाविषयीची असलेली आवड आणि या आवडीतूनच वृक्ष, पक्षी, प्राण्यांची लागलेली गोडी. निसर्गासाठी काहीतरी योगदान देण्याचे ध्येय घेऊन नाशिकमधील पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड हे मागील एक तपापासून चिमणी संवर्धनासाठी शहरात विशेष परिश्रम घेत आहेत. टाकाऊ फर्निचरच्या तुकड्यांपासून तयार केलेले १४ हजार कृत्रिम घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांचा कृत्रिम घरटी वाटपाचे अभियान आजही सुरू आहे.