हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने शहरवासीयांच्या डोळ््यांचे पारणे फिटले. शिवराज्य कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून शहरात जणू शिवराज्यच अवतरले होते.