सांगली - भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे मातरम् अशा जयघोषात आणि सामाजिक भान जपत सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी लावलेल्या पणत्यांनी येथील कृष्णाकाठ सोमवारी सायंकाळी उजळून गेला. धीरगंभीर वातावरणात वीर जवान तुझे सलाम! एक पणती जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सांगलीकरांनी कृष्णाकाठावर गर्दी करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.