कोल्हापूर -अंगावर थंडगार पाण्याचे फवारे... बैलगाडीतून सफारी... जादूचे खेळ..., अशा उत्साही वातावरणात कचरावेचक मुलांनी रमणमळा येथील वॉटर पार्क येथे ‘फुल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते बालदिनानिमित्त ड्रीम वर्ल्डने सामाजिक बांधीलकी जपत कचरावेचक कुटुंबातील मुलांसाठी ‘फन फेअर’चे आयोजन केले होते.