मराठीमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यावर्षी सोनालीसाठी गणेशोत्सव खास आहे. कारण लग्नानंतरचा सोनालीचा हा पहिला गणेशोत्सव आहे. सोनालीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह गणरायाची पूजा केली. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही सोनालीने भाऊ अतुल कुलकर्णीसोबत घरच्या घरीच बालगणेशाची मूर्ती साकारली आहे. शाडूच्या मातीपासून अतुल कुलकर्णीने ही मूर्ती साकारली असून सोनालीने तिची रंगरंगोटी केली आहे.
#sonalikulkarni #ganeshutsav #pune