Ganesh Festival : कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी श्रींच्या चरणी पालकमंत्र्यांची प्रार्थना| Sakal Media
कऱ्हाड (सातारा) : सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने केली. राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दुर होवु दे, राज्यातील जनतेला सुख समृद्धी प्राप्त होउ दे, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी केली. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक जशराज पाटील, आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील, कऱ्हाड पालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, दिग्विजय पाटील, केयुर पाटील आदी उपस्थित होते. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#GaneshFestival #Karad #Satara #BalasahebPatil #Maharashtra #ganeshchaturthivideos