Rain Updates Jalgaon (Chalisgaon) : चाळीसगाव परिसरावर आभाळच फाटले..पून्हा पूर स्थिती
Chalisgaon (Jalgaon) : चाळिसगाव परिसराव पून्हा आभाळ फाटले असून ३० व ३१ आॅगस्ट रोजी आलेल्या पुराच्या कटू आठवणी पून्हा आठव्या दिवशी जागा झाल्या. पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने चाळिसगाव मधील सर्वज लघू प्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गिरणा नदी व इरत नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहे. तसेच मन्याड धरणाच्या परिक्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह रात्री दोन ते अडीच वाजता मन्याड धरणातून पास होत आहे. या कारणाने गिरणा नदीला पूर आला आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
#Chalisgaon #jalgaon