Rain Updates Nashik (Nandgaon): नांदगावात पुराचा हाहाकार; रेल्वे स्थानकात शिरले पाणी
Nandgaon (Nashik) : गेल्या दोन दिवसांपासून सुरु सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे काल पासून सुरू असलेला पाऊस (ता.७) मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता. परिणामी लेंडी व शाकांबरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आलेला नव्हता. परिणामी लेंडी नदीवरील सबवे ते रेल्वे स्थानकापर्यंत भुसावळ मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी झाले.रेल्वे स्थानकावर पाणी पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोहशिंगवे वालूर व मोरझर या क्षेत्रात प्रचंड मुसळधार राशी पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने लेंडी व शाकंबरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दहेगाव नाका गुलजारवाडी भागातील नागरिकांची घरे पाण्याखाली येवून दोन फुटाएवढे पाणी या भागातील घरात घुसले .तर दुसरीकडे लेंडी नदीच्या पाण्याला वाट मिळाले नाही.
(व्हिडिओ - संजीव निकम)
#nandgaon #floods #nashik