गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी ही नवीन जोडी प्रेक्षकांना 'माझा होशील ना' या मालिकेतून पाहायला मिळाली. या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली आहे. नुकतेच गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शे्अर केले आहेत. तिच्या पहिल्या फोटोमध्ये तिने विराजससोबत फोटो शेअर केलाय. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मालिकेतील आदित्यचे सर्व मामा पाहायला मिळतायेत. गौतमीने हे फोटो शेअर करत ‘आफ्टर सो लाँग’ असं कॅप्शन दिलयं. हे सगळे पुन्हा कशासाठी एकत्र आलेत असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. तर हे सगळे गणेशोत्सवानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान एकत्र आले होते. चाहते आपल्या लाडक्या सई-आदित्यला पुन्हा एकत्र पाहून खूपच आनंदी झाले आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट करत या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छादेखील व्यक्त करत आहेत.
Snehal Vo
#GautamiDeshpand #VirajasKulkarni #MajhaHoshilNaFame #Lokmatfilmy