पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांचे राज ठाकरेंनी कौतुक केले. कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला.