Janmashtami at ISKCON temple | श्रीकृष्णजन्माष्टमी :इस्कॉन मंदिरातील जन्माष्टमी| Nashik|Sakal Media
नाशिक : द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा ऑनलाइन होणार आहे. सरकारने अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे श्रावण महिना उजाडूनदेखील कुठल्याही मंदिरांच्या आवारात भाविक उपस्थित राहू शकलेले नाहीत. मंदिरात पूज्य राधानाथ स्वामी यांचे प्रवचन, अभिषेक, कीर्तन, महाआरती असा सोहळा होईल. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण मुर्तीला फुलांचा शृंगार केला होता. यावेळी चिमुकल्यासह मोठयांनी दर्शनासाठी लगबग केली होती. (व्हिडिओ - केशव मते)
#Janmashtami #ISKCONtemple #Nashik #JanmashtamiatISKCONtemple