Buldhana | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्केटिंगचे स्वप्न साकार | Skating Academy| Sakal Media
हिवरा आश्रम (जि. बुलडाणा) : जिल्ह्यातील हिवरा आश्रम सारख्या खेड्यातील विद्यार्थ्यांना स्केटिंग शिकण्यासाठी शहरी भागात धाव घ्यावी लागत होती. मात्र, हिवरा आश्रम येथील रवी लोखंडे यांनी टॅलेंट हंट स्केटिंग अकॅडमी ग्रामीण भागात सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्केटिंग शिकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आज या ठिकाणी जवळपास ८० विद्यार्थी स्केटिंग धडे गिरवत आहेत. भविष्यात या स्केटिंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी जिल्हास्तर, राज्यस्तरावर निवड होईल. ग्रामीण भागात स्केटिंग क्लास सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्केटिंग शिकण्याची जिद्द निर्माण झाली आहे. (व्हिडिओ : संतोष थोरहाते)
#Buldhana #SkatingAcademy #hiwaraashram #Studentsfromruralareas