सातारा : वडूज(Vaduj) पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयिताने सातारा(Satara)येथील सदर बझार परिसरातील बालसुधारगृहात आज सकाळी आत्महत्या(Suicide) केली. हे समजताच मृताच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्याने तिथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल(Aanchal Dalal), पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर(Bhagwan Nimbalkar) यांनी घटनास्थळी भेट घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (व्हिडिओ प्रमोद इंगळे)
#satara #suicide #vaduj #vadujpolice #teenagerssuicide #satarapolice #sataranews #sataraliveupdates