ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन ५० रुपयांची वाढ केंद्र शासनाने बुधवारी जाहीर केली आहे. या अल्पशा वाढीमुळे शेतकरी व शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून केंद्र शासनाची एफआरपीमधील वाढ तुटपुंजी असल्यासारखी आहे. पेट्रोल,डिझेल चे भाव वाढतात मग ऊसाचे का नाही?, असा प्रश्न विचारत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
#RajuShetti #petrol ##diesel