वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये छाप पाडलेला मल्याळी सिनेमा जल्लीकट्टू आता थेट ऑस्करच्या शर्यीतीत उतरला आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी जल्लीकट्टूची निवड झाल्याने सिनेसृष्टीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल आहे. ऑस्करच्या शर्यतीत जल्लीकट्टूसह शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, गुलाबो सीताबो, सीरियस मॅन, बुलबुल, कमल, द पिंक स्काई, बिटरस्वीट आणि दि डिसायपल हे सिनेमे शर्यतीत होेते. मात्र या सगळ्यांना मागे टाकत जल्लीकट्टूची निवड भारतातर्फे ऑस्कर अवॉर्डसाठी झाली आहे. याआधी ऑस्कर पुरस्कारामध्ये मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान यांना परदेशी भाषेच्या चित्रपट विभागात नामांकन मिळालं होतं.
#Lokmatcnxfilmy #Oscar #Entertainmentnews #Jallikoth #lijojosepellissery #Malayalammovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber