Shivsena Vs BJP; आदित्य ठाकरे स्टाईलने शिवसेना कात टाकतेय? सेना झाली शांत डोक्याची?

Sakal 2021-08-23

Views 1.2K

'आरे ला कारे' ने उत्तर देणारी बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thakare) आक्रमक शिवसेना(Shivsena).. आता आदित्य ठाकरे(Aditya Thakare) स्टाईलने कात टाकतेय.. कारण एकीकडे शिवसेनेवर भाजपचे नारायण राणे(Narayan Rane) गरळ ओकतायत... तर दुसरीकडे शिवसैनिक केवळ इशारा देऊन, दुर्लक्ष करतायत.. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा(Shivsena) हा अंदाज सर्वांनाच संभ्रमात टाकणाराय.. आगामी मुंबई महानगरपालिकेची सूत्रे भाजपने नारायण राणेंकडे सोपवलीयत.. त्याचप्रमाणे शिवसेनेने पालिका निवडणुकीची कमान आदित्य ठाकरेंकडे(Aditya Thakare) दिलीय.. आणि आदित्य ठाकरेंनी या निवडणुकांना शांत डोक्याने सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे मुरब्बी नारायण राणेंविरुद्ध पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंचा सामना रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.. इतकेच काय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची दखलही न घेता, त्यांच्याबाबतच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिलाय.
#adityathakare #shivsena #narayanrane #bjp

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS