potholes on Aurangabad-Jalna highway: औरंगाबाद-जालना महामार्गावर मोठ- मोठे खड्डे
करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जालना महामार्गाची (Aurangabad-jalna-highway)गेल्या दीड वर्षात न झालेली डागडुजी व मागील वर्षी पडलेला विक्रमी पाऊस यामुळे या महामार्गाची पूर्णतः चाळणी झाली होती. दरम्यान, मागील पंधरवाड्यापासून विकासक यंत्रणेकडून सुरू असलेली डागडुजी हा देखाव्याचा फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. कारण ही दुरूस्ती म्हणजे पुढे पाठ मागे सरसपाट अशी ठरत आहे. औरंगाबाद-जालना महामार्गावरील (Aurangabad-jalna-highway)शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. (व्हिडिओ : संतोष शेळके) (potholes on Aurangabad-Jalna highway)
#Aurangabad #potholes #RainySeason #highwaypotholes #AurangabadJalnahighway