Governor Bhagat singh koshyari :भगतसिंह कोश्यारी यांनी सिंहगड केला सर | Sinhagad Fort | Sakal Media
पुणे (Pune) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) आज, सोमवारी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवनेरीनंतर (Shivneri)त्यांनी सिंहगडाला (sinhagad fort) भेट दिली. वयाच्या 80 व्या वर्षी कोश्यारी यांनी चालत सिंहगड सर केला. सिंहगडावरील तानाजी मालुसरे (Tanaji Malusare)यांच्या समाधीचे यावेळी राज्यपालांनी दर्शन घेतलं. ''माझ्या राजकीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती, बुद्धी, शक्तीच गुणगान इतिहासकारांनी केलं आहे. युक्ती बुद्धी शक्तीने राज्य केलं. शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आहे. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे, तो शिक्षणात आला पाहिजे. आपली मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजेत असे'' माहिती राज्यपालभगतसिंग कोश्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
#Pune #BhagatSinghKoshyari #SinhagadFort #Governor #shivneri #TanajiMalusare #Shivajimaharaj