विजय पाटकरांसह रंगकर्मी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Mumbai : मुंबईतील दादर (Dadar)परिसरात आंदोलन करणाऱ्या रंगकर्मींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विजय पाटकर,( Vijay Patkar) मेघा घाडगेसह (Megha Ghadge) रंगकर्मींना दादर पोलिसांनी (Dadar Police)ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रातील रंगकर्मींनी सोमवारी दादर इथं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. कोरोनाच्या (Corona)प्रादुर्भावामुळे प्रभावित होऊन मनोरंजन विश्व गेले दिड वर्ष ठप्प आहे. मानसिक तसेच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलावंतांच्या वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा यासाठी ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विजय पाटकर, मेघा घाडगे, मिलिंद दस्ताने, विनय गिरकर, संदेश उमप, उमेश ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार, बॅकस्टेज कलाकार, (Backstage performers) मिमिक्री आर्टिस्ट, (Mimicry artist)ऑर्केस्ट्रा कर्मचारी सहभागी झाले होते.
#Mumbai #Dadar #VijayPatkar #MeghaGhadge #Actor #Mimicryartist #Backstageperformers #Police