Navneet Rana With Placards : कृपया संसदेचे कामकाज चालू द्या
Delhi : आपल्या विविध आंदोलनाने नेहमीच साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या Amravati च्या खासदार Navneet Rana यांनी शुक्रवारी Delhi तील The Parliament House च्या परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर placards झळकावून संसदेचे कामकाज चालू द्यावे, अशी मागणी विरोधीपक्षांकडे केली. संसदेत शेतकरी, विविध राज्यांचे मुद्दे, महाराष्ट्र, पूर, बेरोजगारी, कोरोना यासह अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे. आदिवासीबहुल भागातील मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. या ज्वलंत मुद्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यातून उपाययोजना होऊ शकतात. त्यामुळे विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू द्यावे व या समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशी मागणी खासदार Navneet Rana यांनी आंदोलनाच्या निमित्ताने केली.
#navneetrana #placards ##parliamenthouse #delhi